‘कालनिर्णय दिवाळी सांस्कृतिक २०२०’मध्ये ‘२० साल बाद…’ हा आशय गुणे यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखाची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी १९४० सालचा वि. स. खांडेकर संपादित ‘ज्योत्स्ना’ या दिवाळी अंकातील ’२५ वर्षांनंतरचा महाराष्ट्र’ तसेच १९९७ सालच्या ‘कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी’ अंकातील ‘महाराष्ट्र २०२०’ हे लेख वाचायला हवे. ’२५ वर्षांनंतरचा महाराष्ट्र’ या परिसंवादाच्या धर्तीवर १९९७ साली ‘कालनिर्णय दिवाळी सांस्कृतिक’तर्फे ‘महाराष्ट्र २०२०’ हा परिसंवाद आयोजित करण्यत आला होता. २०२० साली महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल? सामाजिक, सांस्कृतिक व राजकीयदृष्ट्या महाराष्ट्रात कोणते चित्र पाहायला मिळेल आदी मुद्द्यांवर या परिसंवादादरम्यान चर्चिले गेले, यावर मते मांडण्यात आली. ही मते, भाकिते कितपत खरी झाली किंवा हे दावे फोल ठरले, याचा आढावा आशय गुणे यांनी ‘२० साल बाद…’ या लेखातून घेतला आहे. आशय गुणे यांचा लेख वाचा, ‘कालनिर्णय दिवाळी सांस्कृतिक २०२०’मध्ये