Horoscope Marathi - Kalnirnay Horoscope - June 2019
Tuesday, 3 December 2024 3-Dec-2024

Horoscope (Marathi)- June 2019

राशीभविष्य - जून २०१९

मेष

तुमच्या मेहनतीला चांगले फळ मिळेल.नोकरी-व्यवसायात केलेले प्रयोग यशस्वी होतील.पूर्वार्धात आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी थोडी कसरत करावी लागेल,मात्र उत्तरार्धात गोष्टी मनाजोगत्या घडतील.


वृषभ

 महिन्याचे ग्रहमान संमिश्र स्वरूपाचे आहे.सहकाऱ्यांवर जास्त विसंबून न राहता स्वावलंबनाचा मार्ग अवलंबावा लागेल.आपल्या भविष्यकालीन व्यावसायिक योजना,संकल्पना याबाबत गुप्तता पाळा.डोळ्यांच्या विकारांकडे दुर्लक्ष नको.


मिथुन

‘कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है,’हे लक्षात असू द्या. कष्टाशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही.खर्चावर नियंत्रण आवश्यक.आप्तेष्टांच्या मतभेदाला खतपाणी घालू नका,वेळीच मिटवा.विरोधकांवर मात करू शकाल.


कर्क

महिन्याचा पूर्वार्ध अनुकूल आहे.थोरामोठ्यांच्या कृपाशीर्वादाने अडचणी सहजगत्या दूर होतील.भागीदारी व्यवसायात आर्थिक बाबींत थोडी अधिक दक्षता घ्या. मोहाचे क्षण कटाक्षाने टाळावे लागतील.महिलांवर कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे ओझे वाढणार आहे.


सिंह

या महिन्याचे ग्रहमान तुम्हाला प्रोत्साहनपर असे आहे.कार्यक्षेत्रात तुमच्या कर्तृत्वाची वरिष्ठांकडून योग्य दखल घेतली जाईल.मनाजोगत्या जबाबदाऱ्या मिळतील. आर्थिक लाभही होईल.स्थावर मालमत्तेबाबतचे वाद मिटतील


कन्या

सध्याच्या स्पर्धात्मक काळात व्यक्तिगत आणि कार्य-क्षेत्राशी निगडित बाबी यांच्यात योग्य अंतर ठेवा.कार्य-यशस्वीतेसाठी प्रयत्नात सातत्य व कामात अचूकता आवश्यक.व्यवसायानिमित्त प्रवास संभवतो.उत्तरार्ध अनुकूल आहे.


तूळ

भांडणामुळे मनस्तापा-बरोबरच वेळ-पैसाही खर्च होतो.यापासून दूर राहिल्यास मनस्वास्थ्य लाभेल आणि यशप्राप्तीही संभवते.उगाच प्रतिष्ठेचा बाऊ करू नका. वादग्रस्त प्रकरणापासून दूरच राहा.‘आ बैल मुझे मार’ अशी अवस्था करू नका.


वृश्चिक

आशावादी असणे यात काहीच गैर नाही,परंतु त्यासाठी आपल्या मर्यादाही विचारात घ्याव्या लागतात.कोणावरही विसंबून न राहता आपल्या कर्तृत्वावर अधिक भर द्या.उधारी-उसनवारी टाळा.प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.


धनु

महिन्याच्या पूर्वार्धात रविचे पाठबळ असले तरी वैयक्तिक बाबींत अतिदक्ष राहणे आवश्यक आहे.कुटुंबातील सदस्यच काही कारणांमुळे विरोधात गेल्याने ‘आपलेच दात अन् आपलेच ओठ,’ अशी अवस्था होईल.नेत्रविकाराचे त्रास जाणवतील.


मकर

पूर्वार्धात मित्रपरिवारात एखादी अप्रिय घटना संभवते,परंतु त्यावर आपली प्रतिक्रिया लगेच व्यक्त करू नका.उत्तरार्धात आर्थिक पातळी सुधारेल.रखडलेली कामे मार्गी लागून कार्यसिद्धी होईल.विरोधकांना नमवू शकाल.


कुंभ

जमा आणि खर्च यांचा ताळमेळ घालताना तारेवरची कसरत करायला लावणारा हा महिना आहे.शब्द जपून वापरा. एखाद्या प्रकरणात विरोधक आपली कोंडी करण्याचा प्रयत्न करतील.चातुर्याने त्यांच्यावर मात करावी लागेल.


मीन

तुमच्या कार्याची वरिष्ठांनी योग्य दखल घेतली गेल्यामुळे तुम्ही सुखावून जाल.कार्यक्षेत्रात आर्थिक लाभ होईल.विरोधकांच्या संख्येत थोडी वाढ संभवते,सतर्क राहा. रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.


Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.