दुसरा श्रावणी सोमवार

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर on   July 31, 2017 in   श्रावणमास

श्रावणातील दुसऱ्या सोमवारी हिमाचल प्रदेशातील  चंबा प्रांतात एक जत्रा भरते. ती पुढे बरेच दिवस चालू असते. ह्यावेळी गोडधोड खाण्याचे. जेवणाचे आणि गाण्यांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. शेवटच्या दिवशी सगळी मंडळी मिरवणूक काढून नदीवर जाऊन मंत्रोच्चारांसह वरूण देवतेसाठी त्या नदीच्या पात्रात वाहत्या प्रवाहामध्ये मक्याच्या कणसाचे केस आणि नारळ सोडतात. मग सर्वजण परस्परांना अत्तर लावून मिठाई वाटतात.

सद्यस्थिती : आपल्या देशात किती विविध तऱ्हेचे लोकप्रथा आहेत. त्याचे हे एक मधुर उदाहरण दिले आहे .