Title: गवतारी इकोफ्रेंडली बालगणेश घर ?
Votes: 63
Category: Household Ganpati - घरगुती गणपती/ Eco Friendly - इको फ्रेंडली
Views: 1058
Description: *सामाजिक संदेश :-* *प्ल्यासटिकचा वापर पुर्णतः टाळले , तर अपव्यय(वाया/फुकट/waste) काही होणार नाही, पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही. पैसे खर्च पण होणार नाहीत. "गणपतीला अभिप्रेत / पर्यावरणाला पूरक(इकोफ्रेंडली), असा गणेशोत्सव" _गणेशभक्तांना-जनजागृती देऊन खूप आनंद देईल.*_ पर्यावरणाला पूरक असा (पुर्णतः प्ल्यासटिक मूक्त), गणेशोत्सव साजरा करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आहे.पर्यावरणाला पूरक (इकोफ्रेंडली) असा मखर बनविण्यासाठी वेळ लागतो ,पण बाप्पा १० पटीने आनंद देतो सुद्धा, व तो आम्ही अनुभविला आहे. सतत एकजूटीने येऊन, काम करण्याची प्रेरणा मिळाली. *कल्की च्या झाडापासून बाँडी फ्रेम बनविली. नारळाच्या झावळ्या (झावळ्यांना-विनून) पासुन भिंती रचल्या. मखराच्या कळसा साठी पेंढा वापरण्यात आला आहे. फळे ठेवण्यासाठी लाकडी टोपली वापरली. मातीचा बालगणेश, पाटाखाली मातीच आच्छादन आहे.औषधी तुळस नेहमी शुद्ध वायु देत असल्याकारणास्तव, मखरात तुळस रोपण (ग्रिनरी) केली आहे.*
Comments:
There are no comments.
You must be logged in to post a comment