Title: टावरे कुटुंबातील घरगुती गणेशोत्सव
Votes: 334
Category: Household Ganpati - घरगुती गणपती/ Eco Friendly - इको फ्रेंडली
Views: 2796
Description: राम मारुती रोड ठाणे येथे राहणारे टावरे कुटुंब हे ६९ वा घरगुती गणेशोत्सव साजरा करत आहेत. आम्ही गेल्या १८ वर्षांपासून थर्मोकोलचा वापर थांबविला आहे. आम्ही गणपतीची विविध प्रकारची सजावट कागदी शिल्पातुन समुद्राखालील जग व पक्षी, स्टेन ग्लास, वारली पेंटिंग, कॅलिग्राफी, कॅरिकेचर, जपानी संस्कृती, कच्छ संस्कृती, रांगोळ्या, पणत्यांची रोषणाई, 3 डी पेंटिंग, मुखवटे, फुलपाखरे इ. केली आहेत. यावर्षी आम्ही आमच्या गणपतीची रचना कागदातून तयार केलेल्या संगीत वाद्य सोबत केली आहे. सितार, संतूर, सरोद, नादश्वरम, शहनाई, डमरु, बांसुरीसारखे पारंपारिक भारतीय संगीत साधने आपले लक्ष वेधतात. दुसरीकडे आम्ही सॅक्सोफोन, व्हायोलिन, ट्रम्पेट, एकॉर्डियन, गिटार, ड्रमची सुंदर निर्मिती पाहतो. या भित्तिचित्रांवर संगीत सादर करणारे पश्चिम आणि भारतीय संगीतकारांची छान सीमा आहे. आम्ही वीणा, तबला, मृदंगम, ढोलकी, गिटारसारख्या खास पारंपारिक उपकरणे देखील प्रदर्शित केली आहेत. सजावटीसाठी साजेसे सुरेल शास्त्रीय संगीत ताल धरायला लावते. गणेशमूर्ती व सजावट पर्यावरणस्नेही आहे. सुप्रसिद्ध कलाकार श्री. संदीप गजकोश यांनी कागदाच्या लगद्याचा वापर करून आपली गणपती मूर्ती तयार केली आहे. त्यांनी इको फ्रेंडली रंगांचा वापर केला आहे. आमची गौरी मूर्ती कायम स्वरुपी आहे आणि आम्ही तेरड्याच्या पानांमधून बनविलेल्या गौरीलाच विसर्जित करतो. ढोलावर ठेवलेली गणपती मूर्ति लक्ष आकर्षित करते. अमरावती येथून अतुल जिराफे यांनी तयार केलेली गौरी मूर्ती खरोखरच नितांतसुंदर आहे. गौरी पारंपरिक सोन्याच्या दागिन्यांनी मढलेली आहे. या सजावटमध्ये थर्मोकोल किंवा प्लॅस्टिकचा उपयोग केलेला नाही.
Comments:
There are no comments.
You must be logged in to post a comment