Title: Ganpati 2018
Votes: 2
Category: Household Ganpati - घरगुती गणपती/ Eco Friendly - इको फ्रेंडली
Views: 635
Description: कळत नव्हते तेव्हा ही पहिल्यांदा हात तुलाच जोडले होते दूडू दूडू चालायला लागलो तेव्हा तुझ्याच कडे मन वेधले होते लिहायला लागलो तेव्हा सुद्धा तुझे नाव प्रथम लिहीले पाटीवर प्रत्येक दिवशी शाळेमध्ये प्रणम्य शिरसा म्हणालो अगोदर जीवनात पहील्यांदा परिक्षा दिली तुलाच नमस्कार केला होता अन पास झालो होतो ना देवा तेव्हा तुझाच प्रसाद खाल्ला होता पहिल्यांदा काही हवे होते तेव्हा तुलाच मोदकांची लाच घेउन आलो होतो अन आपण त्या लायक नाही कळले तेव्हा तुझ्याच पाशी ढसा ढसा रडलो होतो जसं जसे जीवन पुढे जात राहीले खूप काही झाले खूप सहनही केले खूप आनंद आले अन सुखाने भोगले तु सोबत होतास आहेस तर सारे जमले हळू हळू सारे सोडून तूच आवडू लागलास बाप्पा मी तुझाच होतो तु ही माझाच झालास राहीले आहेत तेवढे श्वास मला कधी सोडू नकोस माझ्या गणपती बाप्पा मला कधी विसरू नकोस कधी सुद्धा विसरू नकोस
Comments:
There are no comments.
You must be logged in to post a comment