उपवासाचा तिरंगी ढोकळा – वैशाली जोशी

Published by वैशाली जोशी on   August 10, 2019 in   2019उपवासाच्या रेसिपीश्रावणमास

उपवासाचा तिरंगी ढोकळा


साहित्यः- २ वाट्या वरीचे तांदूळ, १ वाटी साबुदाणा, १/२ वाटी राजगिऱ्याच्या लाह्या, १ १/२ वाटी आंबट ताक, हिरवा
व केशरी खाण्याचा रंग, आले-मिरची पेस्ट, १ चमचा जिरेपूड, १ चमचा बेकिंग सोडा, चवीपुरते मीठ, फोडणीसाठी १
चमचा साजूक तूप, वरून सजविण्यासाठी ओले खोबरे.

कृतीः- वरीचे तांदूळ व साबुदाणा चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. नंतर त्यातील पाणी काढून त्यात
राजगिऱ्याच्या लाह्या व आंबट ताक घालून हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या व चार तास झाकून ठेवा. या
मिश्रणात आले-मिरची पेस्ट, मीठ घालून मिक्स करून घ्या. त्याचे तीन वेगवेगळे भाग करून घ्या. एका भागात हिरवा
खाण्याचा रंग व बेकिंग सोडा घालून मिक्स करा. एका डब्याला थोडे तूप लावून मिश्रण त्यात ओता. कुकरची शिट्टी
काढून पाच मिनिटे वाफवून घ्या. नंतर त्यात पांढरे मिश्रण व बेकिंग सोडा घालून परत पाच मिनिटे वाफवून घ्या. शेवटी
त्यात केशरी रंगाचे मिश्रण व बेकिंग सोडा घालून पंधरा मिनिटे वाफवून घ्या. छान गार झाल्यावर ढोकळा चौकोनी
आकारात कापून वरून ओले खोबरे घालून खायला द्या.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


वैशाली जोशी