उपवासाची मिसळ
साहित्य:
१ वाटी शेंगदाणे, १/२ वाटी काजू, १/२ वाटी भिजलेला साबुदाणा, ओले खोबरे, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, जिरे, तूप, मीठ, लाल तिखट, गूळ, कोथिंबीर, हिरवी मिरची (चवीनुसार), थोडीशी चिंच, १ काकडी, १ लिंबू, थोडे बटाटा वेफर्स किंवा चिवडा.
कृतीः
उसळः तुपाची फोडणी करून त्यात मिरचीचे तुकडे, आल्याची पेस्ट, शिजवलेले शेंगदाणे, काजू तुकडे घालून परता. भिजलेला साबुदाणा, बटाट्याच्या फोडी घालून मीठ घाला. परतून झाल्यावर उसळ बाजूला ठेवा.
रस्साः चिंचेच्या कोळात ओले खोबरे, जिरे घालून बारीक वाटून घ्या. तुपाची फोडणी करून त्यात जिरे, लाल तिखट घाला. नंतर वाटण घालून परतून घ्या. यात मीठ, गूळ आणि पाणी घालून रस्सा तयार करा. डिशमध्ये उसळ घालून त्यावर उकडलेल्या बटाट्याच्या फोडी व रस्सा घाला. वरून बारीक चिरलेली काकडी, ओले खोबरे, बटाटा चिवडा, कोथिंबीर घालून लिंबू पिळा. थोडा रस्सा व वेफर्स सोबत द्या.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
उल्का ओझरकर