कच्च्या केळी चे दहीवडे
साहित्य:
१ डझन केळी, १/३ वाटी वरई किंवा शिंगाड्याचे पीठ, राजगिऱ्याचे पीठ, १/२ वाटी दाण्याचे कूट, ३ वाट्या दही, १०-१२- हिरव्या मिरच्या, साखर, जिरेपूड, खाण्याचा सोडा, कोथिंबीर, मीठ.
कृती:
केळी सोलून उकडून घ्या. थंड झाल्यावर ती कुस्करून घ्या. त्यात जिरे, चवीप्रमाणे मीठ आणि वाटलेल्या हिरव्या मिरच्या घाला. या सर्व मिश्रणाचे गोल चपटे वडे करून घ्या. वरी, शिंगाडा, राजगिऱ्याचे पीठ पाण्यात कालवून पातळ करा. तयार केलेले वडे या पिठात बुडवून तळून घ्या. तळलेले वडे पाण्यात घालून बाहेर काढून हलक्या हाताने दाबून त्यातील पाणी काढून टाका. दही थोडे घुसळून घेऊन त्यात वाटलेले आले, साखर, मीठ, चिरलेली कोथिंबीर, घाला. तळलेले वडे दह्यात सोडा. सर्व्ह करताना त्यावर तिखट भुरभुरा.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
अनुष्का कुलकर्णी