साहित्य(उपवासाची रेसिपी): २ मोठी राजेळी केळी (पिकलेली), २ वाटी किसलेला ओला नारळ, ७-८ काजू, १ वाटी चिरलेला गूळ, १ चमचा गूळ, १ चमचा वेलची- जायफळ पूड, तळण्यासाठी तूप.
कृती(उपवासाची रेसिपी): प्रथम राजेळी केळीचे सालीसकट दोन तुकडे करा. मग ते तुकडे कुकरमध्ये पाच मिनिटे शिटी न लावता चाळणीवर ठेवून वाफवून घ्या.
पुरण: काजू तव्यावर थोडेसे भाजून घ्या, लाल होऊ देऊ नका. काजू व किसलेला नारळ मिक्सरमध्ये थोडा बारीक करून घ्या. काजूमुळे चव थोडी मऊ व खुसखुशीत होतो. एका कढईत गूळ वितळवून वाटलेले मिश्रण गुळामध्ये परतून घ्या. मोदकासाठी गोड चव करतो, तसा चव तयार होईल. उकडलेली केळी थंड झाल्यावर साले काढून हाताने कुस्करून घ्या. मिश्रण एकदम मऊ झाले पाहिजे. या लगद्यातील एक छोटा गोळा घेऊन त्याची खोल वाटी करा व त्यात नारळाचा चव भरा व ती वाटी बंद करा. असे जेवढे होतील तेवढे उंडे बनवून घ्या. फ्राय पॅनवर थोडे तूप टाकून हे सर्व उंडे तळून घ्या. शॅलो फ्राय करा.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.