मिश्र डाळींचे चमचमीत नाचोज
साहित्य :
१/४ कप तूरडाळ, १/४ कप हरभरा डाळ,
१/४ कप मसूर डाळ, १/४ कप मूगडाळ,
१/२ कप तांदूळ, १/२ कप गव्हाचे पीठ,
२ चमचे नाचणीचे पीठ, २ चमचे ओट्स पावडर,
२ चमचे मैदा, १ चमचा लाल तिखट,
१ चमचा जिरे पावडर, १/२ चमचा चाट मसाला,
१ चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, १/४ कप तेल.
कृती :
सर्व डाळी व तांदूळ एकत्र करून स्वच्छ धुऊन दोन तास भिजवा. नंतर यातील पाणी निथळून कापडावर वाळवा (उन्हात वाळवू नये). कोरडे झाले की पाणी न घालता मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. एका परातीत बारीक केलेले मिश्रण घ्या. त्यात गव्हाचे पीठ, नाचणीचे पीठ, ओट्स पावडर, मैदा व सर्व मसाले घालून पाणी न घालता मळून घ्या. आता त्यात पाव कप तेल घालून मळून घ्या. दहा मिनिटे झाकून ठेवा. या पिठाची चपाती लाटून नाचोज सारखे आकार कापून तळून घ्या. एका वाटीत तिखट, मीठ, चाट मसाला घालून एकत्र करा. गरम नाचोज वरती भुरभुरा.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
सुप्रिया बाळी