हेल्दी स्नॅक्स बार | हेमांगिनी देशपांडे | Healthy Snacks Bar | Hemangini Deshpande

Published by हेमांगिनी देशपांडे on   December 16, 2020 in   2020Recipes

हेल्दी स्नॅक्स बार

साहित्य : २ वाट्या जाड पोहे (मंद भाजून हाताने कुस्करून), १/४ वाटी मिल्क पावडर, १/४ वाटी खारीक पावडर, १/२ वाटी काजू-बदामाची जाडसर पावडर, १/२ वाटी शेंगदाणा कूट, १/४ वाटी काळ्या मनुका, १/४ वाटी मगज बी (थोडी गरम करून), १/४ वाटी मखाने  (तुपात परतून त्याची भरड), ११/२ वाटी गूळ, २ चमचे तूप, ४ चमचे दूध, १ चमचा जायफळ-वेलची पावडर, १ चमचा भाजलेली अळशी.

कृती : गॅसवर कढईत तूप, दूध, गूळ घाला. गूळ वितळल्यानंतर त्याचा  फेस येऊ लागला की गॅस बंद करा. त्यात पोहे, शेंगदाणा कूट, काजू-बदाम पावडर, मनुका, मगज बी, मखान्याची भरड, अळशी, जायफळ-वेलची पावडर, खारीक पावडर, मिल्क पावडर घालून एकत्र करा. ट्रेला तुपाचा हात लावून त्यात मिश्रण ओतून थापा. लगेच त्याच्या लांबट पट्ट्या कापून त्या गार झाल्यावर बटर पेपरमध्ये रॅप करून ठेवा. हवे तेव्हा खाण्यास स्नॅक्स बार द्या

टीप : पोहे कमी-जास्त घेऊ शकता. आवडीप्रमाणे ओट्सही घेता येतील.


– हेमांगिनी देशपांडे