कॉर्न कोन स्टफ्ड् साल्सा
कोन साठी साहित्य : १ कप कॉर्नफ्लोअर, २ चमचे मैदा, १ चमचा शुद्ध तूप, चिमूटभर मीठ व बेकिंग पावडर, ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स, १/३ कप आंबा प्युरी.
साल्सा साठी साहित्य : १/४ कप आंब्याचे काप, १/४ कप चिरलेली हिरवी आणि लाल सिमला मिरची, १/४ कप उकडलेले कॉर्न, १/४ कप चिरलेला पातीचा कांदा, १ हिरवी मिरची, ११/२ मोठा चमचा कच्च्या आंब्याच्या फोडी, चिमूटभर ओरिगॅनो, चिली फ्लेक्स, मीठ आणि लिंबाचा रस.
कोनची कृती : आंबा प्युरीसह सर्व साहित्य एकत्र करून पीठ मळून घ्या. तीस मिनिटे पीठ तसेच ठेवून नंतर त्याचे रोल करा आणि त्यांना पट्ट्यांमध्ये कट करा. कोनच्या भांड्यात पट्ट्या टाकून १८०० सेल्सिअसवर प्रीहीटेड ओव्हनमध्ये ठेवून बारा-पंधरा मिनिटे बेक करा.
साल्साची कृती : कच्च्या व पिकलेल्या आंब्याच्या फोडी आणि सर्व भाज्या मसाला घालून मिक्स करा. हे सर्व सारण कोनमध्ये भरून सर्व्ह करा.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
वर्षा तेलंग, पुणे