कॉर्न बाकरवडी
सारणासाठी साहित्य : १ वाटी मक्याचे दाणे, १ वाटी दूध, २ चमचे बटर, २ चमचे तीळ, १/२ चमचा बडीशेप.
हिरवे वाटण : ४ चमचे कोथिंबीर, कढीपत्ता, आले, हिरवी मिरची, ओले खोबरे, जिरे, मीठ, आमचूर पावडर, चवीसाठी साखर, ४ हिरव्या मिरच्या.
कव्हरसाठी साहित्य : १/२ वाटी मक्याचे पीठ, २ चमचे कॉर्नफ्लोअर, १/२ वाटी मैदा, २ चमचे तूप किंवा तेल, ओवा, तळण्यासाठी तेल.
कृती : स्वीट कॉर्न / मक्याचे दाणे स्वच्छ धुऊन त्यामध्ये थोडे दूध घालून मिक्सरमधून वाटून घ्या. नंतर एका पॅनमध्ये दोन चमचे बटर घालून ते चांगले वाफवून घ्या आणि गार करा. एका बाऊलमध्ये मक्याचे पीठ, मैदा, कॉर्नफ्लोअर, तुपाचे मोहन, ओवा व मीठ घालून हे मिश्रण घट्ट मळून घ्या. हिरवे वाटण व गार झालेले मक्याचे सारण एकजीव करून घ्या. मिश्रणाचा गोळा घेऊन पोळपाटावर त्याची पोळी लाटा. त्यावर कॉर्नचे सारण एकसारखे पसरवा आणि तीळ पेरा. त्यानंतर पोळीची गुंडाळी करून तिचे एकसारखे काप करा व तेलामध्ये तळून घ्या. टोमॅटो सॉससोबत या बाकरवड्या सर्व्ह करा.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
संध्या जोशी, नाशिक