कॉर्न रबडी विथ कॉर्न खरवस
रबडीसाठी साहित्य : १ वाटी उकडलेले मक्याचे दाणे, १/४ लिटर दूध, ३ चमचे साखर, १/४ चमचा केशर सिरप, १/२ चमचा वेलची पूड.
खरवसासाठी साहित्य : १/४ वाटी मक्याचे दाणे, ४ चमचे साखर, १/४ चमचा जायफळ पूड, १/४ चमचा वेलची पूड, केशर (ऐच्छिक).
सजावटीसाठी साहित्य : भाजलेल्या मगज बिया.
कृती : दूध तापवून थोडे आटवून घ्या. मक्याचे दाणे वाफवून मिक्सरमधून जाडसर फिरवून घ्या. दूध आटत आले की त्यात बारीक केलेले मक्याचे दाणे टाका. नंतर यात वेलची पूड, केशर सिरप घालून गॅस बंद करा. रबडी गार होत आली, की साखर घालून ढवळा. खरवसासाठी मक्याचे दाणे बारीक करून घ्या. पंधरा मिनिटे भांडे तसेच ठेवा. हळूहळू खाली मका स्टार्च बसतो. वरील पाणी फेकून द्या. स्टार्चमध्ये एक वाटी दूध घालून ढवळा. यात जायफळ आणि वेलची पूड घाला. पंधरा मिनिटे वाफवा. गार झाल्यावर वड्या कापा. सर्व्ह करताना बाऊलमध्ये रबडी घ्या. त्यात खरवस वड्या ठेवून भाजलेल्या मगज बियांनी सजावट करा.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या
लीना इनामदार, पुणे