टोमॅटो लाडू | जयश्री भवाळकर, भोपाळ | Tomato Ladoo | Jayshree Bhawalkar

Published by जयश्री भवाळकर, भोपाळ on   February 20, 2021 in   2021Recipes

टोमॅटो लाडू

साहित्य : २५० ग्रॅम लाल पिकलेले टोमॅटो, १ वाटी साखर, १/२ वाटी खोबऱ्याचा बारीक कीस, १/४ वाटी मिल्क पावडर, २ थेंब गुलाबी रंग, १/२ चमचा लिंबाचा रस, १/२ कप मावा.

सजावटीसाठी :  पेपरकप, चांदीचा वर्ख.

कृती : टोमॅटो वाफेवर किंवा मायक्रोवेव्हमध्ये उकडून घ्या. थंड झाल्यावर साल काढून मिक्सरमध्ये वाटून गाळणीने गाळून घ्या. कढईत टोमॅटोचा गर व साखर घालून आटवून घ्या. थोडे घट्ट किंवा मिश्रण अर्ध झाल्यावर खोबऱ्याचा कीस घाला. दोन-चार मिनिटांनंतर मावा, रंग व लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करा. मिश्रणाला पाणी सुटू लागल्यावर मिश्रण थंड होऊ द्या. लाडू वळून पेपरकपमध्ये ठेवा. चांदीच्या वर्खाने सजवून सर्व्ह करा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


जयश्री भवाळकर, भोपाळ