तांबड्या भोपळ्याच्या बीचे मगज लाडू
साहित्य : १ कप भोपळ्याच्या रोस्टेड बिया, १/२ कप सुक्या खोबऱ्याचा कीस, ३/४ कप भाजलेल्या मखानाची पूड, ३/४ कप डिंक, ८-९ खजूर, २ चमचे काजू-बदाम-खारीक पूड, १ चमचा वेलची पूड, चवीपुरते किसलेले जायफळ, ४ चमचे साजूक तूप.
कृती : सर्वप्रथम भोपळ्याच्या बिया पॅनवर गरम करून मिक्सरला वाटून पीठ करून घ्या. कढईत एक चमचा तूप घेऊन वाटलेले पीठ भाजून घ्या. किसलेले खोबरे भाजून हाताने
कुस्करून घ्या. एक चमचा तुपात डिंक तळून त्याची पूड करून घ्या. खजुराच्या बिया काढून पेस्ट करून घ्या. मग मोठ्या भांड्यात भाजलेल्या बियांचे पीठ, भाजलेल्या खोबऱ्याचा कीस, भाजलेल्या मखानाची पूड, डिंक पूड, खजूर पेस्ट, काजू, बदाम, खारीक पूड, वेलची पूड, किसलेले जायफळ हे सर्व साहित्य हाताने मिक्स करा. त्यात दोन चमचे गरम साजूक तूप घालून लाडू वळून घ्या.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
नमिता शिंदे, मुलुंड