मिलेट्स सँडविच
साहित्य : १ वाटी मिक्स मिलेट्स पीठ (कोंडू, रागी, बाजरी कुटून त्याचे पीठ), १/२ वाटी ताक, उकडलेले स्वीटकॉर्न, १/२ वाटी शेवया, २ मोठे चमचे चिरलेल्या भाज्या (गाजर, कांदा, सिमला मिरची), चाट मसाला, आवश्यकतेनुसार मीठ व बटर, चीझ स्लाइस, हिरवी चटणी, सॉस, २ मोठे चमचे लोणी.
सारण बनविण्याची कृती : बटरमध्ये भाज्या, स्वीटकॉर्न, हिरवी चटणी, उकडलेल्या शेवया, मीठ आणि चाट मसाला घालून मिश्रण एकजीव करा.
सँडविच बनविण्याची कृती : सर्वप्रथम पिठात ताक व मीठ घालून डोशाच्या पिठाप्रमाणे भिजत घाला. त्यानंतर तवा गरम करून घ्या, त्यावर बटर घालून एक डाव तयार पिठाचे मिश्रण पसरवा. या डोशावर तयार सारण पसरवून वरून चीझ स्लाइस घाला. मग पुन्हा त्यावर एक डाव पीठ घालून काही वेळाने सँडविच परतवा. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. त्रिकोणी काप करून सर्व्ह करा.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
टीप : मिलेट्स म्हणजे तृण-धान्याचे पीठ.
– दीपाली मुनशी, नागपूर