मूगडाळ सँडविच
साहित्य : १ वाटी मूगडाळ, १ आल्याचा तुकडा, २ हिरव्या मिरच्या, १ कप बारीक चिरलेला कांदा-कोथिंबीर, १ कप उकडलेले मकादाणे, १ चमचा काळी मिरी पावडर, १ कप स्मॅश पनीर, १/२ चमचा खायचा सोडा, चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार तेल.
कृती : मूगडाळ चार तास पाण्यात भिजत ठेवा. भिजवलेल्या मूगडाळीत पाणी न घालता आले, हिरव्या मिरच्या घालून वाटून घ्या. एका भांड्यात पनीर, कोथिंबीर, कांदा, मकादाणे, काळी मिरी पावडर व मीठ घालून सर्व एकत्र करून स्टफिंग तयार करा. मूगडाळीच्या पिठात चवीनुसार मीठ घालून मिश्रण फेटून घ्या. सँडविच टोस्टरला तेलाने ग्रीस करा. पिठात खायचा सोडा घालून मिश्रण फेटून घ्या. टोस्टरच्या एका बाजूने मूगडाळीचे पीठ पसरवून तयार स्टफिंगचे मिश्रण पसरवा. दुसऱ्या बाजूने मूगडाळीचे पातळ पीठ पसरवून घ्या. टोस्टर बंद करून गॅसवर दोन्ही बाजूने भाजून घ्या.टोमॅटो सॉस व हिरवी चटणीसोबत खायला द्या.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
नंदिका रावराणे, मुंबइ