स्वीट कॉर्न झुणका मोदक
साहित्य : २ वाट्या वाफवलेले स्वीट कॉर्न,२ वाट्या तांदळाचे पीठ, ५-६ सुक्या लाल मिरच्यांची पेस्ट,१/२ चमचा जिरे पेस्ट, ३/४ चमचा हळद, १ चमचा चिरलेली कोथिंबीर, १ चमचा लिंबूरस, चवीपुरते मीठ व कांदा, तेल.
कृती : स्वीट कॉर्न मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. पॅनमध्ये तेल घालून मिरची पेस्ट, वाटलेले स्वीट कॉर्नचे मिश्रण, लिंबूरस, हळद, मीठ व चवीपुरता चिरलेला कांदा, कोथिंबीर घालून झुणका परतून घ्या. नंतर दुसऱ्या पॅनमध्ये दोन वाट्या पाणी घालून त्यात किंचित मीठ व एक चमचा तेल घालून पाण्याला उकळी काढून घ्या. उकळी आल्यावर त्यात तांदळाचे पीठ घाला. या मिश्रणावर झाकण ठेवून दोन मिनिटाने गॅस बंद कर. थोड्या वेळाने पीठ मळून त्याची पारी करून त्यात झुणक्याचे सारण भरा व मोदक वळून दहा ते बारा मिनिटे वाफवून घ्या.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
कुसुम झरेकर, पुणे