अन्नपूर्णा लाडू | मंदाकिनी सोनावणे, औरंगाबाद | Annapurna Ladoo | Mandakini Sonavne, Aurangabad

Published by मंदाकिनी सोनावणे, औरंगाबाद on   June 25, 2021 in   2021Paknirnay Recipe

अन्नपूर्णा लाडू

साहित्य : प्रत्येकी १ चमचा चणाडाळ, मूगडाळ, उडीदडाळ, मटकीची डाळ, तांदूळ, चणे, मूग, मटकी, चवळी, शेंगदाणे, बाजरी, ज्वारी, गहू, ओट्स व मका, प्रत्येकी २ चमचे काजू, बदाम व डिंक यांची पावडर, २ चमचे खोबऱ्याचा कीस, २ चमचे मिल्क पावडर, १ कप गूळ, ४ चमचे तूप.

कृती : सर्व डाळी व कडधान्ये हलके भाजून त्याचे पीठ करून घ्या.हे पीठ चाळून घेऊन दोन चमचे तुपावर खमंग भाजून घ्या.दुसरीकडे गूळ वितळायला ठेवा.गूळ चांगला वितळला की त्यात तूप व पीठ घालून चांगले एकत्र करून घ्या.मग त्यात जायफळ पावडर, काजू, बदाम व डिंक पावडर, खोबरे घालून सर्व एकत्र करून त्याचे लाडू वळा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


मंदाकिनी सोनावणे, औरंगाबाद