व्यायाम करा कुटुंबासंगे !| गुगल गृहिणी | Exercise With Family | Google

Published by Kalnirnay on   August 2, 2021 in   2021Health MantraReaders Choice

व्यायाम करा कुटुंबासंगे

सध्या सुरू असलेल्या कोरोनासारख्या साथीमुळे घराबाहेर पडणे कमी झाले आहे.मुलेही घरातच बसून कंटाळली आहेत. अधिकाधिक काळ घरातच राहावे लागण्याच्या या काळात शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे.कोरोनामुळे घराबाहेर पडण्यावर बंधने आलेली असल्यामुळे जिममध्ये जाऊन व्यायाम करणे शक्य नसले, तरी घरच्या घरी व्यायाम करणे नक्कीच शक्य आहे.जिममधील महागडी उपकरणे, हायफाय मशीन्स घरी नसली, तरी सहकुटुंब व्यायाम करून फिटनेसचा हा तास नक्कीच इंटरेस्टिंग करता येईल.

  • असा करून घ्या व्यायाम:

१.सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुलांसोबत आपण पालकांनीही व्यायाम करायला सुरुवात करा.आपण ज्या पद्धतीने व्यायाम त्यांना शिकवू, त्या पद्धतीने मुले व्यायाम करतील.

२.व्यायामाची सुरुवात वॉर्मअपने करावी.जागच्या जागी जॉगिंग, हात-पाय-मान यांचे रोटेशन, पुशअप्स, स्कॉट्स करून घ्या.

३.मुलांकडे सायकल असेल तर जागच्या जागी सायकलिंग करून घ्या.

४.लादी पुसणे, झाडू मारणे यांसारख्या गोष्टी मुलांकडून करून घ्या.यामुळे त्यांना घरकामाची सवयही होईल, त्यांचा तितकाच व्यायामही होईल आणि तुम्हालाही घरकामात मदत मिळेल.

५.स्वयंपाकघरातील काही वजनदार वस्तू किंवा डबे यांसारख्या साधनांनी तुम्ही मुलांकडून व्यायाम करून घेऊ शकता.

६.घराला जर अंगण असेल, तर मॉर्निंग वॉक, जॉगिंग, जेवणानंतर शतपावली आदी व्यायाम करून घेता येईल.

७.घरातल्या घरात धावणे-चालणे यांसारख्या गोष्टीही मुलांकडून करून घेऊ शकता.

८.घरातील बेड किंवा सोफ्याच्या साहाय्याने पुशअप्स करू शकता.

९.पाण्याच्या किंवा कोल्ड्रिंक्सच्या बॉटल्स पाण्याने भरून त्यांचा वापर करून मुलांना उठाबशा काढायला लावा.

१०.अॅरोबिक्स किंवा डान्स स्टेप्सचा वापर करून मुलांसोबत व्यायामाचा आनंद घेता येतो.

११.दररोज सकाळी सूर्यनमस्कार करण्यामुळे शरीराचा चांगला व्यायाम होतो.

१२.  बैठका मारणे, योगासने हे आणखी काही उत्तम पर्याय तुमच्याकडे आहेत.

१३.मुलांकडून घराची साफसफाई करून घ्या.यामुळे शारीरिक श्रम होऊन कॅलरीज जळतात.हाही एक प्रकारचा व्यायामच म्हणता येईल.

१४.भिंती पुसणे, बाथरूमची साफसफाई करणे यांसारख्या गोष्टींतूनही शरीराची हालचाल होते.

१५.मुलांकडून बागकामसुद्धा करून घेऊ शकता.झाडांना खत-पाणी देणे, माती उकरणे, बागेतील कचरा साफ करणे अशा गोष्टी केल्यास शारीरिक हालचाली होतात व मुलांमध्ये कामासोबत व्यायामाची आवडही निर्माण होते.तसेच त्यांच्यामध्ये बागकामाची आवडही निर्माण होते.

१६.घरातल्या घरात मुलांसोबत पकडापकडी, लपाछपी, दोरीवरच्या उड्या मारणे यांसारखे खेळ खेळल्यास मुलांना आनंदही मिळतो व कॅलरीज जळतात.यामुळे शरीर आणि मन दोन्ही फ्रेश राहण्यास मदत होते.

१७.जिने चढणे-उतरणे किंवा जिन्याच्या साहाय्याने स्कॉट्स करणे अशा ऌप्रकारच्या गोष्टी मुलांकडून करून घ्या.

१८.खुर्चीच्या किंवा सोफ्याच्या साहाय्याने स्कॉट्स किंवा उड्या मारणे अशा प्रकारचा व्यायाम हा आणखी एक पर्याय आहे.

१९.खुर्चीच्या मदतीने ट्रायसेप्स डिपसुद्धा मुलांकडून करून घेऊ शकता.यामुळे हाता-पायांच्या स्नायूंना व्यायाम मिळतो.

२०.डान्स करणे हा व्यायामा-बरोबरच आपली आवड जपण्यासाठी एक चांगला पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहे.

अशा प्रकारे सहकुटुंब व्यायाम केल्यास आईबाबांसह मुलांनाही आनंद मिळेल.शारीरिक व मानसिक तणाव कमी होऊन व्यायामाची आवड निर्माण होईल.

अष्टगुणी अश्वगंधा

उगम: भारतातील रुक्ष ठिकाणी आढळते.तसेच श्रीलंका, सिंध, भूमध्य सामुद्रिक विभाग इ.प्रदेशांतही सापडते.

ओळख: मराठी / इंग्रजीत-अश्वगंधा, हिंदी-कंचुकी, गुजराती-असगंध अशी ओळख आहे.तसेच विथानिया सोम्निफेरा या शास्त्रीय नावाने ओळखले जाते.

गुणधर्म: अश्वगंधा ही औषधी वनस्पती सोलॅनेसी या कुळातील आहे.यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, अँटिइन्फ्लमेटरी, अँटिस्ट्रेस आणि अँटिबॅक्टेरियल गुण अधिक प्रमाणात असतात, जे आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि अधिक चांगली झोप येण्यासाठी मदत करतात.

फायदे:

  • मेंदूची कार्यप्रणाली उत्तम राहते.

  • अश्वगंधाचे चूर्ण खाल्ल्याने हृदयाच्या मांसपेशी अधिक मजबूत होतात आणि वाईट कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यासाठी मदत होते.

  • अश्वगंधाचे सेवन केल्यास निद्रा कमी करण्यास मदत होते.तसेच तणावही कमी होतो.

  • कर्करोगावर मात करण्यासाठी साहाय्यकारक.

  • मधुमेह व थायरॉईड कमी करण्यास तसेच रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर.

  • मोतीबिंदू किंवा डोळ्यांच्या आजारांवर परिणामकारक.

  • वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी व वजन कमी करण्यासाठी उपयुक्त.

  • त्वचेवर सुरकुत्या किंवा त्वचा सैल पडत असल्यास अश्वगंधाचा फेस पॅक लावा.

  • त्वचेवर येणारी सूज, जखम भरण्यासाठी किंवा संसर्गाचा धोका टाळण्यासाठी फायदेशीर आहे.

  • अश्वगंधाची पेस्ट केसांच्या मुळाशी लावल्यास केस वाढण्यास मदत होते.

  • पांढरे केस, कोंडा, स्काल्पमध्ये खाज, लाल रॅशेस, धूळ यापासून केसांचा बचाव करण्यासाठी अश्वगंधा उपयुक्त आहे.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.