कलिंगडाच्या सालीचा हांडवो | आशा नलावडे, पुणे | Watermelon Rind Handvo | Aasha Nalawade, Pune

Published by आशा नलावडे, पुणे on   April 26, 2021 in   2021Recipes

कलिंगडाच्या सालीचा हांडवो

साहित्य : २ वाट्या कलिंगडाच्या सालीचा पांढरा भाग, १ कप तांदूळ, १/२ कप हरभराडाळ, १/४ कप तूरडाळ, २ चमचे उडीदडाळ, २ चमचे आले-हिरवी मिरची पेस्ट, १/२ कप दही, १/२ कप गाजराचा कीस, आवश्यकतेनुसार कोथिंबीर, कढीपत्ता, तीळ, तेल.

कृती : तांदूळ, हरभराडाळ, तूरडाळ, उडीदडाळ स्वच्छ धुऊन चार तास भिजवून ठेवा. मग त्यात दही घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या. मिश्रण रात्रभर आंबवून दुसऱ्या दिवशी त्यात कलिंगडाचा कीस, गाजराचा कीस, आले-मिरची पेस्ट, कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करा. नॉनस्टिक पॅनमध्ये तेल घेऊन त्यात कढीपत्ता, तीळ व वाटलेले मिश्रण घाला. झाकण ठेवून एका बाजूने दहा मिनिटे चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्या. पुन्हा दुसऱ्या बाजूने दहा मिनिटे भाजा. चटणी किंवा सॉससोबत हांडवो सर्व्ह करा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


आशा नलावडे, पुणे