स्वयंपाकघरातील बाग काम घराच्या परसात बाग फुलवणे, हे काही आपल्यासाठी नवीन नाही. पण सध्याच्या सिमेंट-क्राँकीटच्या जगात घराला परसदारच नसल्यामुळे बाग फुलविण्याची हौस भागवणे शक्य होत नाही. मात्र या समस्येवर तोडगा निघाला, तो ‘किचन गार्डन’ किंवा ‘टेरेस गार्डन’च्या रूपाने. घराच्या गॅलरीत किंवा गच्चीत फुले-फळझाडे लावून आपली ही हौस अनेक जण भागवताना दिसतात. घरगुती बाग फुलवतानाच हळूहळू अनेकांचा ओढा शेती