संवाद: पंधरावी विद्या आणि पासष्टावी कला! भाषा ही भावना आणि विचार मांडण्यासाठीचे मूलभूत साधन आहे. जे सोपे असते, ते लोकप्रिय होते. लिहिण्यापेक्षा बोलणे सोपे आणि नैसर्गिकही. त्यामुळे अर्थातच, ‘बोलण्याचा’ प्रसार फारच झपाट्याने झाला असावा. पण बोलणे वाढले किंवा विस्तारले, ह्याचा अर्थ प्रत्येकाला ‘संवाद’ साधता येऊ लागला असे अजिबात नाही. किंबहुना ‘संवादाचा अभाव’ किंवा ‘lack of communication’ हा सध्याच्या जगातला जवळजवळ सगळ्यात