व्यक्तीचरित्र Archives - Kalnirnay
Tuesday, 5 November 2024 5-Nov-2024

Category: व्यक्तीचरित्र

यश | Bollywood Actress | Madhuri Dixit | Mumbai | Kalnirnay 1994 | Calendar

कर्तृत्वाने की नशिबाने | माधुरी दीक्षित | Capability or Fate | Madhuri Dixit

Published by माधुरी दीक्षित on   May 14, 2018 in   मराठी लेखणीव्यक्तीचरित्र

  यश मिळवणे हे जितके कठीण असते तितकेच ते पचवणेही कठीण असते. लोकांना नेहमी मिळविलेले यशच डोळ्यासमोर दिसते. परंतु त्या यशाच्या मागे घेतलेली मेहनत, परिश्रम यांचा विचार कधी ते करीत नाहीत. यशाबरोबर पैसा, कीर्ती आणि वलय हे प्राप्त होते. अशा प्रसिद्धीचे वलय प्राप्त होणाऱ्या क्षेत्रातील मी एक असल्यामुळे मला त्या वलयाचा आणि मिळालेल्या कीर्तीचा म्हणावा

Continue Reading

त्र्यंबक बापूजी ठोंबरे – बालकवी | फुलराणी

Published by Jyotirbhaskar Jayant Salgaonkar on   May 4, 2018 in   मराठी लेखणीव्यक्तीचरित्र

बालकवींची ‘ फुलराणी ‘ ही नितांतसुंदर कविता मराठी भाषेतील काव्यसौंदर्याचे एक मनोहर शब्दशिल्प आहे. या कवितेतील कल्पकता, तिचे भाषावैभव, भावलाघव हे सगळे इतके मोहक आहे की, बालकवी म्हटल्यावर फुलराणीचीच आठवण व्हावी. हिरव्या हिरव्या गवताच्या मखमालीच्या गार गालिच्यावर फुलराणी खेळत होती. आईबरोबर झोपाळ्यावर बसून गाणी गावीत आणि आनंदात रमावे, हेच त्या अल्लड, अवखळ आणि अजाण मुलीचे

Continue Reading
तुकाराम बीज - कालनिर्णय मराठी लेखणी

तुकाराम बीज

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   March 1, 2018 in   व्यक्तीचरित्र

महापुरुष, संत, कवी हे जन्मावे लागतात, ते घडविता येत नाहीत असे आपण समजतो. हा समज खोटा ठरविणारे आपल्याकडील जबरदस्त व्यक्तिमत्त्व म्हणजे संत तुकाराम महाराज! तुकोबा एका सुखवस्तू घरात जन्माला आले. त्यांची वंशकुळी मोरे आणि आडनाव अंबिले. तीन भावांमध्ये तुकोबा मधले. थोरला भाऊ थोडासा विरक्त. घर-प्रपंच व्यवस्थित चाललेला असताना या कुटुंबावर एकामागोमाग एक आपत्ती कोसळू लागल्या.

Continue Reading

हुतात्मा महात्मा गांधी

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   January 29, 2018 in   मराठी लेखणीव्यक्तीचरित्र

१९४८ मध्ये ३० जानेवारी रोजी म्हणजे आजच्याच दिवशी महात्मा गांधी या जगातून गेले. गांधीजी देहरुपाने गेले असले तरी मरावे परी कीर्तिरुपे उरावे या समर्थांच्या वचनाप्रमाणे ते उरलेले आहेतच. जगभरचे विचारवंत आजही गांधीजींच्या विचारांची मुक्त कंठाने स्तुती करीत असतात. नेल्सन मंडेलांसारखा जगन्मान्य नेता आपल्या अलौकिक यशाचे श्रेय गांधीजींच्या तत्त्वज्ञानाला देतो. त्यांच्या निधनाला चार दशके लोटल्यावरही त्यांच्यावरचा

Continue Reading
Punjab Kesari

नररत्न लाला लजपतराय व स्वातंत्र्यलढा

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   January 27, 2018 in   मराठी लेखणीव्यक्तीचरित्र

भारताच्या स्वातंत्र्यलढयात लाल, बाल, पाल ही त्रिमूर्ती बरीच गाजली. लाल म्हणजे लाला लजपतराय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपीनचंद्र पाल. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या तेव्हाच्या काँग्रेस पक्षात जहाल आणि मवाळ असे दोन पक्ष होते. ही त्रिमूर्ती जहाल पक्षाची अग्रणी म्हणून ओळखली जाई. लाला लजपतराय यांचा जन्म २८ जानेवारी १८६५ रोजी झाला. लालाजींच्या वडिलांचे नाव

Continue Reading

न्यायमूर्ती रानडे

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   January 16, 2018 in   मराठी लेखणीव्यक्तीचरित्र

लोकोत्तर महापुरुषांच्या असामान्य गुणांचे दर्शन त्यांच्या लहानपणीच घडू लागते. न्यायमूर्ती रानडे याची शांत, समंजस, न्यायी वृत्ती अशीच त्यांच्या लहानपणीच्या अनेक घटना-प्रसंगांमधून दिसून येते. घरातील खांबाकडून पराभव एकदा आईने माधवाच्या दोन हातांवर बर्फीचे दोन तुकडे ठेवले त्यातील मोठा तुकडा माधवासाठी आणि लहान तुकडा मोलकरणीच्या मुलासाठी होता, पण ते सांगावयास आई विसरली. परिणामी छोट्या माधवाने मोठा तुकडा

Continue Reading

स्वामी विवेकानंद

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   January 12, 2018 in   मराठी लेखणीव्यक्तीचरित्र

‘ज्ञान हा जीविताचा आदिहेतू आहे. दुसरा हेतू सुखप्राप्ती हा आहे. या दोहोंच्या सांगडीनें हा विश्र्वसमुद्र तरुन पैलतीरास तुम्ही जातां आणि तीच मुक्ती ! पण ही मुक्ती एकटयालाच मिळवितां येत नाही. जगातील कीडमुंगीसारखे प्राणी मुक्त होतील तेव्हाच तुम्हांस खरा मुक्तिलाभ होईल. सर्व सुखी होईपर्यंत आपण एकटे सुखी आहोंत असे म्हणण्याचा अधिकार कोणासही नाही. तुम्ही कोणाला दुःख

Continue Reading

गुरुगोविंदसिंग – दहावे शीख गुरु

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   December 24, 2017 in   Festivalsव्यक्तीचरित्र

‘जो कोणी मला परमात्मा म्हणेल, तो अधोगतीला जाईल. मी फक्त देवाचा दास असून या जगाचा खेळ पाहण्यासाठी आलो आहे’ हे उद्गार आहेत शिखांचे दहावे गुरु गुरुगोविंदसिंह यांचे ! जन्माची कथा गुरु तेगबहाद्दूर हे शिखांचे ९ वे गुरु, गुरुगोविंदसिंह हे त्यांचे पुत्र. पाटण्यात २६ डिसेंबर, १९६६ला माता गुजरीच्या पोटी गुरुगोविंदसिंहांचा जन्म झाला. ‘हा साक्षात ईश्वराचा अंश

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.