उपलब्ध माहिती, कागदपत्रे यांच्या साहाय्याने समर्थभक्त कै. शंकर श्रीकृष्ण तथा नानासाहेब देव यांनी असा निष्कर्ष काढला आहे की, समर्थ एकूण १०२९ गावी गेले होते. ज्या काळी वाहनांची, रस्त्यांची सोय नव्हती, त्या काळी समर्थांनी केलेले हे भ्रमण आहे. लोक काशी-रामेश्वराच्या तीर्थयात्रेला निघतांना घरच्यांचा निर्वाणीचा निरोप घेत. तीर्थयात्रेवरून जिवंत परत येणे हे त्या काळी जवळजवळ अशक्यच मानले