‘प्रेम ‘ एक साधा शब्द. फक्त दोन अक्षरी. त्याचा अर्थ सांगावा लागत नाही. सगळ्यांना कळतो. आणि लहान-मोठी, गरीब-श्रीमंत, अडाणी-शहाणी, सगळीच माणसं कोणावर तरी, केव्हातरी प्रेम करतात. अहो, अगदी कुरूप, अपंग, अर्धवट माणसालादेखील त्याच्या आईचं प्रेम लागतंच. काही काही वेळा तर एखादी आई त्या प्रेमापोटी आपलं सगळं आयुष्य अशा मुलाला सांभाळण्यात घालवते. शब्द साधा, सगळ्यांना समजणारा,