स्मार्ट फोन्स हे सध्याच्या युगातले एक अविभाज्य अंग बनले आहे. केवळ शरीराला जोडलेला नाही म्हणून, अन्यथा त्याला अवयव हाच योग्य शब्द असू शकतो. दर काही मिनिटांनी आरशात स्वतःला न्याहाळावे तसे दर काही वेळाने स्मार्ट फोन चेक करणे हे जणू काही अपरिहार्य आहे. पण मुळात हातात असणारे हे यंत्र चालते तरी कसे? एवढ्या सगळ्या सुविधा आणि