चांदोबा, चंपक ते श्यामची आई लाॅकडाऊनमुळे परीक्षा रद्द होऊन बरीच मोठी सुट्टी बच्चे कंपनीला मिळाली आहे. या सुट्टीत बहुतांश मुलांची पसंती मिळते ती टीव्ही आणि मोबाइललाच. इलेक्ट्राॅनिक गॅजेट्सच्या आहारी गेलेल्या या मुलांचं बालपण पाहिल्यावर मला आठवलं, ते माझं बालपण. टीव्हीसुद्धा क्वचित पाहायला मिळणाऱ्या ८०-९०च्या दशकातील आमच्या पिढीसाठी हक्काचा पर्याय असायचा तो पुस्तक वाचनाचा. अक्षरांची ओळख