विनायक संकष्ट चतुर्थी व्रत-श्रावण कृष्ण चतुर्थी ह्या तिथीला गणेशाची ‘विनायक’ ह्या नावाने पूजा करावी. दिवसभराचा उपवास करु शकता. सायंकाळी स्नान करुन शुचिर्भूत होऊन मग नेहमीप्रमाणे श्रीगणेशाची संकष्ट चतुर्थीला करतात तशी यथाविधी पूजा करावी. चंद्रोदयानंतर गणेशाला लाडवांचा नैवैद्य दाखवावा. पूजेनंतर लाडवांचेच दान द्यावे. सर्व दु:ख-संकटांचा परिहार होऊन सुखसमृद्धी लाभावी म्हणून हे व्रत करतात. युधिष्ठिराने हे व्रत