Festivals Archives - Page 4 of 8 - Kalnirnay
Wednesday, 6 November 2024 6-Nov-2024

Category: Festivals

धनत्रयोदशी | धनतेरस | धन्वंतरी | दिवाळी

धनत्रयोदशी

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   October 17, 2017 in   Festivals

धनत्रयोदशी आज धनत्रयोदशी आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण त्रयोदशी ज्या दिवशी प्रदोषकाल-व्यापिनी असेल त्या दिवसाला धर्मशास्त्राप्रमाणे ‘धनत्रयोदशी’ म्हटले जाते. धनत्रयोदशी या शब्दाचा अपभ्रंश ‘धनतेरस’ असा आहे. या दिवशी धनाची पूजा करण्याचा पूर्वापार परिपाठ आहे. याच दिवशी ‘यमदीपदान’ असाही एक शास्त्रार्थ दिलेला असतो’ यमाला या दिवशी दीपदान करावे, असे धर्मशास्त्राचे सांगणे असले तरी यमाला दीपदान कसे करणार

Continue Reading

दिवाळीचे महत्त्व

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   October 16, 2017 in   Festivals

आपण तेजाचे उपासक आहोत. शतकानुशतके आपण प्रकाशमार्गावरचे पथिक आहोत. सर्व प्रकारचा अंधार मागे टाकून उच्चल प्रकाशाच्या दिशेने आपले प्रत्येक पाऊल पुढे पडावे, अशी मनोमन इच्छा बाळगणारे आपण फार मोठी परंपरा आणि मोलाचा सांस्कृतिक वारसा असलेल्या भारत देशाचे नागरिक आहोत. आपली दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे, हा प्रकाशाचा उत्सव साजरा करताना आपण काळोख्या रात्रीला तेजोरत्नांच्या अलंकारांनी

Continue Reading

वसुबारस

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   October 16, 2017 in   Festivals

गाय आणि तिचे वासरु हे निर्व्याज प्रेमाचे प्रतीक मानले जाते. गाय वासरावर जे प्रेम करते ते केवळ अनुपमेय असे असते, तसेच वत्साचे गायीवरचे प्रेम हे अनन्यसाधारण असते. दुसऱ्या कोणाला ते बधत नाही. ओळखत नाही. म्हणून देव-भक्त, आई-मूल, गुरु-शिष्य यामधील प्रेमसंबंधालाही आपली संतमंडळी नेहमी गाय-वासराच्या प्रेमाची उपमा देतात. नामदेवमहाराजांनी, तूं माझी माऊली, मी तुझें वासरुं ।

Continue Reading
कोजागरी | पौर्णिमा | kojagiri purnima story | Sharad Purnima

कोजागरी पौर्णिमा – जागणाऱ्याचे भाग्यही जागते

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   October 4, 2017 in   Festivalsमराठी लेखणी

  कोजागरी पौर्णिमा ब्रह्मदत्त नावाचा गरीब तरुण होता. लग्नकार्य झाले होते, पण बिचाऱ्याला बायको मिळाली ती अतिशय कजाग स्वभावाची. सदानकदा नवऱ्यावर वैतागलेली, घरात प्रसन्नता कसली ती नाहीच. ब्रह्मदत्ताकडे चरितार्थाचे कसलेही साधन नव्हते. घरातील परिस्थिती ओढघस्तीची असल्यामुळे बायको नेहमी कावलेली असे. घरात नोकरचाकर तर सोडाच, पुरेसे अन्नधान्य नाही, मग त्या बायकोने तरी काय करायचे ॽ एक

Continue Reading

विजयादशमी

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   September 29, 2017 in   Festivals

आश्र्विनाच्या शुक्ल पक्षातील ही दशमी श्रवण नक्षत्राच्या योगावर ‘विजयादशमी’ होते. ही विजयादशमी श्रवण नक्षत्रयुक्त आणि सूर्योद्यव्यापिनी असल्यास सर्वोत्तम मानली जाते. ह्या दशमीलाच आपण ‘दसरा’ म्हणतो. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ह्या दिवशी कुठल्याही कार्यासाठी वेगळा मुहूर्त बघावा लागत नाही. (तरीदेखील अपराण्हकाळी म्हणजे दुपारी एक ‘विजयमुहूर्त’ असतो.) दसऱ्याला शेतीतील पहिले पीक वाजतगाजत घरी आणून आनंदोत्सव

Continue Reading

नवरात्र आठवी माळ : दुर्गांबा जयिनी

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   September 27, 2017 in   Festivals

श्रीदेवीचे चरित्र किती विविधांगांनी नटले आहे याचा विचार केला की, मन थक्क होते. अहो, साधी गोष्ट बघा ना, सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांना देवीच्या महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या त्रिविध रूपात महत्त्वाचे स्थान आहे. सत्व, रज, तम हे तिन्ही गुणविशेष जगरहाटीत आपल्याला निरंतर दिसतात आणि जगरहाटीसाठी ते आवश्यकही आहेत. महाकालीने उग्ररूप धारण करून महिषासुराचा

Continue Reading

नवरात्र : नटली ती रमणी

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   September 26, 2017 in   Festivals

आज नवरात्रीचा सातवा दिवस. आज आपण श्रृंगारमयी अशा देवीचे स्तवन करणार आहोत. आपण शब्दफुलांची आरास मांडून नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी देवीला वेगळ्या रूपात पाहत आहोत. तिचे स्तवन करून तिला विनम्र भावाने वंदन करीत आहोत. नवरात्रीनिमित्त हा शब्दोत्सव मांडलेला असल्यामुळे इथे श्रद्धेचा भाग आहेच, पण देवीकडे पाहण्याचा विविध स्वरूपांचा दृष्टिकोन रोज वेगवेगळ्या शब्दांत व्यक्त होत असल्यामुळे देवीची

Continue Reading

नवरात्र : वज्रधारिणी

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   September 25, 2017 in   Festivals

शारदीय नवरात्रीनिमित्त आपण सांप्रत प्रतिदिन देवीच्या विविध रूपांचे वेगवेगळ्या प्रकारांनी स्मरण करीत आहोत. आज नवरात्रीचा सहावा दिवस आहे. ही सहावी माळ देवीच्या चरणी वाहताना आपण तिच्या वज्रधारिणी अशा पराक्रमी रूपाचे ध्यान करून तिला वंदन करणार आहोत. नवरात्रीनिमित्त जे काव्य आपण विवेचनासाठी घेतले आहे, त्या काव्याच्या रचनाकर्त्याला ज्योतिषाचे काही ज्ञान असावे, असे आधी म्हटले होते, त्याची

Continue Reading

नवरात्र : प्रेमांकित जननी

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   September 24, 2017 in   Festivals

आपण या वर्षीच्या नवरात्रात ज्या काव्याच्या आधारे नवरात्र उत्सव साजरा करीत आहोत त्या काव्याच्या कर्त्याला ज्योतिषशास्त्राचे चांगले ज्ञान असावे, असे वाटते. कारण कुंडलीतील पंचमस्थान हे मुलांचे, संततीचे स्थान होय. पाचव्या दिवशी देवीचे स्मरण करताना कवीने तिच्या माता या स्वरूपावर अधिक भर दिला आहे आणि तो देताना तिचे आपल्या मुलांवर कसे प्रेम असते ते सांगितले आहे.

Continue Reading

नवरात्र : नादमय सरस्वती

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   September 23, 2017 in   Festivals

असे सांगतात की, या सृष्टीच्या प्रारंभी एक शब्द निर्माण झाला तो शब्द म्हणजे उकाराचा ध्वनी होय, असे आपण समजतो जगातील इतर ठिकाणी लोक आपआपल्या मतानुसार हा ध्वनी कोणता असेल याचे विविध अंदाज पूर्वापार वर्तवीत आलेले आहेत. एखादा मोकळा शंख कानाला लावला की त्यामधून ॐकाराचा ध्वनी उमटलेला ऐकू येतो. शंखात पाणी किंवा दुसरे काही भरलेले असेल

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.