Festivals Archives - Page 8 of 8 - Kalnirnay
Wednesday, 6 November 2024 6-Nov-2024

Category: Festivals

अक्षय्य तृतीया व अक्षय्य दान

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   April 27, 2017 in   Festivals

अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त! कारागीर या दिवशी शेतीच्या कामाची हत्यारे करावयाला प्रारंभ करतात. शेतकरी वर्ग या दिवसाला विशेष महत्त्व देतो. चातुर्मासासाठी लागणाऱ्या भाजीचे बी खेड्यापाड्यातील स्त्रिया या दिवसात परसातील वाफ्यात पेरतात. हा सण उन्हाळ्यात येत असल्यामुळे या दिवशी पाण्याचा घडा तसेच उन्हासाठी छत्री, पायांत घालावयाचे जोडे दान करण्याची प्रथा आहे. ब्राह्मणाला या

Continue Reading

एकनिष्ठ बलवंत मारुती

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   April 10, 2017 in   Festivals

चैत्र शुक्ल नवमीला रामनवमी झाली की, चैत्र पौर्णिमेला रामाच्या परमभक्ताची म्हणजेच श्रीहनुमानाची जन्मतिथी येते. राजा दशरथाने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञानंतर प्रत्यक्ष अग्निदेवाने दशरथाच्या पदरात जे पायसदान टाकले त्याचा काही अंश एका घारीने पळविला. तो हनुमानाची माता अंजनी हिच्या ओंजळीत पडला. तो तिने प्राशन केला आणि त्यायोगे मारुतिरायाचा जन्म झाला. प्रभू रामचंद्राचे आणि हनुमानाचे नाते असे त्यांच्या

Continue Reading

रघुनाथाचा गुण घ्यावा

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   April 3, 2017 in   Festivals

रामाचे स्मरण म्हणजे काय? रामाचे नाव घेणे हे तर रामाचे स्मरण होतेच, पण स्वतः ला ‘ रामदास ‘ म्हणवून घेण्यात गौरव मानणाऱ्या समर्थांनी दास म्हणे, रघुनाथाचा गुण घ्यावा । असे म्हटले आहे. देवाचे नाव घेत असताना त्या देवाची गुणसंपदा, त्या देवाचे कर्तृत्व, त्या देवाचे वैशिष्ट्य नजरेसमोर ठेवले पाहिजे. रामाची कुटुंबवत्सलता, रामाची सत्यनिष्ठा, रामाचा सत्यवचनी म्हणून

Continue Reading

गुढीपाडवा व कथा

Published by Kalnirnay on   March 27, 2017 in   Festivals

गुढी कशी उभारावी? प्रत्येक नव्या संवत्सराचे स्वागत करताना म्हणजे नव्या वर्षाचा आरंभ करताना घराबाहेर पण दारातच बांबूची म्हणजे कळकाची एक लांब काठी आणून त्याच्यावर एक रेशमी वस्त्र (जमल्यास पीतांबर किंवा एक-दोन हात (वार) लांबीचे बाजारात मिळणारे ‘पामरी’ या नावाचे रेशमी वस्त्र) अगदीच काही नाही तरी नवीन रेशमी साडी निऱ्या काढून बांधावी. त्यावर चांदी, तांबे, पितळ

Continue Reading
होळी | Holi | Dhulivandan

फाल्गुन पौर्णिमा – होळी पौर्णिमा व धूलिवंदन

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   March 11, 2017 in   Festivals

होळी प्रल्हादाची आत्या आणि हिरण्यकशिपूची बहीण ढुंढा (हिलाच काहीजण होलिका म्हणतात. ह्याबद्दल मतमतांतरे आहेत.) हिला अग्नीपासून अभय होते. त्यामुळे भावाच्या सांगण्यावरून ती प्रल्हादाला जाळून ठार मारण्यासाठी स्वत:च्या मांडीवर घेऊन बसली. मग तिच्याभोवती लाकडे रचून आग लावण्यात आली. मात्र झाले ते उलटेच! भगवान श्रीविष्णूच्या कृपेमुळे प्रल्हाद सुरक्षित राहिला तर ढुंढा राक्षसी मात्र जळून खाक झाली त्या

Continue Reading

महाशिवरात्री व शिवलीलामृत

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   February 3, 2017 in   Festivals

आज महाशिवरात्री. रात्रीचे समान पंधरा भाग केल्यानंतर त्यांपैकी आठवा भाग तो निशीथकाळ होय. जेव्हा निशीथकाळी कृष्ण चतुर्दशी म्हणजे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्याची चौदावी तिथी असेल तिला शिवरात्री असे म्हणतात. माघ महिन्यात या शिवरात्रीस विशेष महत्त्व असल्याने तिला महाशिवरात्री असे म्हणतात. ही महाशिवरात्री म्हणजे महादेव शिवशंकराच्या भक्तांच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा मानला गेलेला दिवस होय. आपल्याकडे शिवपूजन आसेतुहिमाचल

Continue Reading
श्रीगणपती | Shri Ganpati | Mahotkat Vinayak | Mahotkat Ganesh

गणेश जयंती आणि महोत्कट विनायक | ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर | Ganesh Jayanti and Mahotkat Vinayak

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   January 30, 2017 in   FestivalsGaneshotsav

गणपती हा ‘ गण–पती ’ कसा झाला? तो लोकांमध्ये इतका प्रिय का आणि कसा झाला? ज्याला वि-नायक किवा  लोक-नायक व्हावयाचे आहे. त्याने सर्व समाजासाठी सुखकर्ता, दु:खहर्ता होणे आवश्यक आहे. दुसऱ्यांच्या डोळ्यातील आसू पुसून त्यांच्या ओठांवर थोडे हसू उमटविण्याची ज्याची प्रवृत्ती तोच लोकनेता लोकप्रिय होऊ शकतो. एक साधी गोष्ट पाहा. कुठल्याही सभा-समारंभात गेलात तर तिथे जी

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.