उपवासाची मिसळ साहित्य: १ वाटी शेंगदाणे, १/२ वाटी काजू, १/२ वाटी भिजलेला साबुदाणा, ओले खोबरे, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, जिरे, तूप, मीठ, लाल तिखट, गूळ, कोथिंबीर, हिरवी मिरची (चवीनुसार), थोडीशी चिंच, १ काकडी, १ लिंबू, थोडे बटाटा वेफर्स किंवा चिवडा. कृतीः उसळः तुपाची फोडणी करून त्यात मिरचीचे तुकडे, आल्याची पेस्ट, शिजवलेले शेंगदाणे, काजू तुकडे घालून परता.