काँचा अंबा आणि अंबुला राई ओदिशा राज्याला बंगालच्या उपसागराची किनारपट्टी लाभली आहे. त्यामुळे ओदिशाच्या जेवणात असे अनेक जिन्नस वापरले जातात, जे समुद्रमार्गे इथे पोहोचले आहेत. येथील पारंपरिक जेवण वैविध्यपूर्णतेने भरलेले असते आणि ते पितळेच्या ताटात वाढले जाते. त्यात भात, आमटी किंवा दालमा, साग भाजा (हिरव्या पालेभाज्या), भाजा (सुकी भाजी) आणि खॉट्टा हे आंबडगोड तोंडी लावणे,