मसालेवाले आलू विथ खीर मसालेवाले आलू इस्लामिक कॅलेंडरच्या सातव्या महिन्यात अनेकांकडे खीरपुरीचा नियाज (प्रसाद) केला जातो. तांदळाच्या दाटसर खिरीसोबत पुरी, करंजी किंवा खाजा खाण्याची पद्धत आहे. ह्या गोडाची चव वाढविण्यासाठी सोबत रगडा/चणामसाला किंवा मसालेवाले आलू बनवले जातात. साहित्य॒: १/४ किलो गोल छोटे बटाटे, १/२ कप चिंचगुळाची चटणी, २ मोठे चमचे तेल, सजावटीसाठी कोथिंबीर, थोडी पुदिन्याची