गर्भावस्थेतील संतुलित आहार मातेचे आरोग्य आणि पोषण हे तिच्या उदरात वाढणाऱ्या गर्भासाठी सर्वात महत्त्वाचे मानले जाते. जर मातेचे पोषण व्यवस्थित झाले नाही, तर तिच्या पोटी जन्माला येणारे बाळ अशक्त जन्मण्याची शक्यता असते. भारतात ७५ टक्के नवमाता अशक्त असतात आणि गर्भधारणेच्या दरम्यान त्यांचे वजन जितके वाढायला पाहिजे तितके वाढत नाही. परिणामी गर्भाची वाढ नीट होत नाही. बाळाचे वजन जन्मतः