मनुष्याला नैसर्गिक रीत्या दोन वेळा दात येतात. एक म्हणजे दुधाचे आणि दुसरे म्हणजे कायमस्वरूपी दात. दुधाचे दात पाचव्या-सहाव्या वर्षी पडून त्या जागी कायमस्वरूपी दात येणार असले, तरी दुधाच्या दातांचीही काळजी घ्यावी लागते आणि तेवढीच काळजी येणाऱ्या कायमस्वरूपी दातांचीही घ्यावी लागते. मात्र सतत गोड खाणे, योग्य रीत्या दात न घासणे, चुकीच्या सवयी आदींमुळे दात किडू शकतात, पडू