आजच्या नव्या युगात एक विलक्षण विचित्र गोष्ट घडत आहे ती अशी, आपली बहुशः कामे यंत्रे करतात. बुद्धीची कामेसुद्धा संगणक प्रणाली करू लागली आहे. पण यंत्रे संगणक आपली कामे करत असूनही ताणतणाव माणसाला येतच आहेत. कामे कमी झाली आहेत, परंतु ताणतणाव कमालीचे वाढले आहेत. आजचा माणूस ताणतणाव पेलू शकत नाही. संपदा पायाशी लोळण घेत असली तरी