मराठी लेखणी Archives - Page 10 of 11 - Kalnirnay
Wednesday, 6 November 2024 6-Nov-2024

Category: मराठी लेखणी

डॉ. संजय देशमुख | कालनिर्णय | जुलै २०१७ | मुंबई विद्यापीठ |

शिक्षणाच्या नव्या दिशा

Published by  - डॉ. संजय देशमुख on   July 18, 2017 in   मराठी लेखणी

अनेक प्रगत देशातल्या विविध शिक्षणव्यवस्था आणि त्यांच्या सर्वोत्तमतेचा मला काहीसा अनुभव आहे. मात्र माझे निकटचे नाते भारतीय शिक्षणव्यवस्थेशी आहे. मी केवळ मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी नाही; तर या मातृसंस्थेत शिक्षक होण्याचे आणि आता या विद्यापीठाचा कुलगुरू होण्याचे भाग्यही मला लाभले आहे. शिकण्याची प्रक्रिया ही शेवटच्या श्र्वासापर्यंत सतत सुरूच असते. आजचे जग हे कालच्यासारखे कधीच नसते, हे

Continue Reading

माझ्या यशाचे रहस्य

Published by सुनील गावस्कर on   July 10, 2017 in   मराठी लेखणी

एकाग्रता म्हणजे संपूर्ण चित्त एकाच विषयावर केंद्रित करून, त्यात प्रावीण्य आणि यश मिळविणे होय. हा विषय कधी प्रत्यक्ष नजरेला दिसणारा असेल तर कधी कल्पनेतला! एखाद्या कल्पनेतला वास्तवात आणून तिला मूर्त स्वरूप देण्यासाठी शरीरातील स्नायूनस्नायू आणि मनातील विचारनविचार त्या गोष्टीवर केंद्रित होणे आवश्यक आहे. माझ्या मते एकाग्रतेची ही ढोबळ व्याख्या आहे. ऋषी आणि महर्षींना ध्यानधारणा करताना

Continue Reading
गंधर्वनाम संवत्सरे - पु. ल. देशपांडे

गंधर्वनाम संवत्सरे …

Published by पु. ल. देशपांडे on   June 27, 2017 in   मराठी लेखणी

या नव्या वर्षाचं नाव पंचांगकर्त्यांच्या लेखी काहीही असलं तरीमराठी नाट्य आणि संगीतप्रेमी माणसाच्या हिशेबी हे बालगंधर्वनामे संवत्सरच आहे. बालगंधर्व नावाचा या महाराष्ट्राच्या नाट्यकला क्षेत्रात जो एक चमत्कार घडला, त्या विस्मयकारक नटवराच्या जन्मशताब्दीचं हे वर्ष आहे. जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रांत उत्तम दर्जाचं कार्य करणाऱ्यांना श्रेष्ठत्व मिळतं, लोकप्रियता मिळतं. पण विभूतिमत्त्व लाभतंच असं नाही. ही कुणी कोणाला उचलून

Continue Reading
नियतीलाही मदत लागते | व.पु. काळे

नियतीलाही मदत लागते

Published by व.पु. काळे on   June 26, 2017 in   मराठी लेखणी

काही काही माणसं जन्माला येतानाच ‘ सुखी माणसाचा ‘ वॉश अँड वेअर सदरा घालून येतात. ‘ वॉश अँड वेअर ‘ असं म्हणायचं, पण या थोर लोकांनाही गरज पडणार नाही असे यांचे योग. किंवा तशी गरज पडलीच तर लाँड्रीचे दुकान यांच्या इमारतीत तळमजल्यावर असतं. वरच्या मजल्यावरून नुसत्या टाळ्या वाजवल्या तरी या महाभागांना एकदम ‘ तव्यावरची पोळी

Continue Reading
थोरली माऊली | म. वा. धोंड - कालनिर्णय निवडक

थोरली माउली

Published by म. वा. धोंड on   June 23, 2017 in   मराठी लेखणी

ज्ञानेश्र्वरीला माउली मानतो, तो मराठी माणूस. माउली का तर तिच्यात आईची माया आहे आणि तिची रचना आईने गायिलेल्या ओवीछंदात आहे म्हणून ज्ञानदेवांना आपल्या ओवीछंदाचे अप्रूप आहे. त्यांनी मोजून दहा वेळा या ओवीछंदाचा निर्देश केला आहे. त्यांतील एक ‘तैसी गाणीव तें मिरवी । गीतेंविण रंगु दावी । ते लोभाचां बंधु ओवी ।केली मियां ॥’असा आहे. ज्ञानदेव

Continue Reading
मी - एक नापास आजोबा - पु. ल. देशपांडे

मी – एक नापास आजोबा

Published by पु. ल. देशपांडे on   June 12, 2017 in   मराठी लेखणी

” सध्या तुम्ही काय करता? ” या प्रश्नाचं ” दोन नातवांशी खेळत असतो ” याच्याइतकं सत्याच्या जवळ जाणारं दुसरं उत्तर माझ्यापाशी नाही. नातवंडांची तलफ कशी येते हे आजोबा- आजीच जाणतात. नातवंडं हे म्हातारपणात लागणारं जबरदस्त व्यसन आहे. गुडघ्यांच्या संधीवातावर अचपळ नातवामागून धावणं हा रामबाण उपाय आहे. आणि एरवी खांदेदुखीमुळे वर न जाणारे हात नातवंडांना उंच

Continue Reading

सिंहासनाधिष्ठित हिंदुपदपातशहा छत्रपती शिवाजी महाराज

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   June 7, 2017 in   मराठी लेखणी

आज ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी! ३४४ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुप्रभाती श्रीछत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे राजसिंहासन भूषविले. शिवाजी महाराज केवळ राजसिंहासनावरच विराजमान झाले असे नव्हे, तर त्या महन्मंगल परमपावन भाग्यक्षणी ते मराठी माणसाच्या हृद्यसिंहासनावरही अनंत काळासाठी स्थानापन्न झाले आणि लोकमानसावर अखंड अविच्छिन्न अधिराज्य गाजविणाऱ्या या वीराग्रणी पुरुषश्रेष्ठाच्या नावाचे नुसते स्मरणही पुढील पिढ्यांपिढ्यांच्या मनात शौर्याची उत्तुंग कारंजी

Continue Reading

मी सचिन….!

Published by सचिन रमेश तेंडुलकर on   May 27, 2017 in   मराठी लेखणी

जीवनात प्रत्येकाला कोणाचा ना कोणाचा तरी आदर्श हा असतोच. लहानपणापासून वडील हेच ‘आदर्श’ होते. हे कर, हे करू नको! असे त्यांनी मला कधीही सांगितले नाही, परंतु तेच माझे खरे ‘हीरो’ होते, आहेत आणि राहतील. आम्ही ‘साहित्य सहवास’ मध्ये चौथ्या मजल्यावर राहायचो, त्यावेळी माझे मित्र, पोस्टमन, कचरा नेणारे, घरगडी ह्यांची विचारपूस वडील आपुलकीने करत. त्यांना सणासुदीच्या शुभेच्छा

Continue Reading

देवळाबाहेरचा माणूस

Published by Vapu Kale on   March 24, 2017 in   मराठी लेखणी

मन आनंदानं वाहू लागलं, म्हणजे मला देवळात जावंसं वाटतं. कोणत्याही गरजेसाठी, याचनेसाठी, कुणासमोर तरी उभं राहावं लागणं, यासारखी मानहानी नाही.  निरपेक्ष  भेटीची शान वेगळीच असते. किंबहुना तीच खरी भेट.  आयुष्यातल्या मागण्या संपणं ही आनंदपर्वणी. मी देवळात  जातो. सरळसरळ मान वर करून आराध्यदैवताचा चेहरा पाहतो. याचना नाही, मग खाली मान कशासाठी? म्हणूनच देवळातून बाहेर पडताना, मी

Continue Reading

जलसंधारणाचे महत्त्व

Published by माधवराव चितळे ( कालनिर्णय, सप्टेंबर १९९४ ) on   March 22, 2017 in   मराठी लेखणी

आपल्याला वर्षभरात लागणाऱ्या पाण्याचा निसर्गचक्रात दरवर्षी नव्याने पुरवठा होण्याचे दिवस म्हणजे मुख्यत: पावसाळ्याचे. कोकणपट्टी वगळली तर महाराष्ट्राच्या इतर प्रदेशात सामान्यत: १५ ते २० मोजके दिवसच पाऊस पडतो. पावसाच्या या मर्यादित दिवसांमध्ये पृथ्वीतलावर पडणारे पाणी वेळीच नीट साठवून घेतले नाही, तर हातचे निघून जाते. पावसाच्या दिवशी पडणारा पाऊसही सातत्याने संथपणे पडत नाही. दिवसातील थोडाच वेळ, पुष्कळदा

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.