आदित्य पूजन

Published by Kalnirnay on   August 11, 2018 in   Festivalsश्रावणमास

आदित्य पूजन : श्रावणातील  प्रत्येक रविवारी आदित्याची पूजा करुन त्याला खिरीचा नैवेद्य दाखवावा.

केवळ श्रावणातील रविवारीच नव्हे, तर वर्षभरातील सर्व रविवारी सूर्यपूजा करावी. नैवेद्य दाखविणे शक्य नसेल तर हरकत नाही. परंतु कुंकुम, अक्षता, फुले वाहून अर्घ्य द्यावे. तेही शक्य नसेल तर नुसता भक्तिपूर्वक नमस्कार करावा. दुपारी बारा वाजण्याच्या आधी गायत्रीमंत्राचा यथाशक्ती जप करावा.

 

श्रावणी रविवार : आदित्य राणूबाई व्रत

गायत्री मंत्र:

ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्।