ज्वारीच्या पिठाचा सॅण्डविच केक ( फ्युजन रेसिपी ) – अदिती पाध्ये

Published by Aditi Padhye on   January 17, 2019 in   2019Food Corner

 

ज्वारीच्या पिठाचा सॅण्डविच केक बनविण्यासाठी 


साहित्य: 

    १. केकसाठी:

  • १ १/२ कप ज्वारीचे पीठ
  • एक कप गव्हाचे पीठ
  • १/२ कप काॅर्नस्टार्च
  • एक कप पालक पेस्ट
  • ३/४ कप सनफ्लोवर तेल
  • १ ते १ १/२ कप दही
  • एक किवा १/२ कप गुळाची पावडर
  • १ छोटा चमचा खायचा सोडा

    २. बीटाचा जॅम

  • ३ मध्यम आकाराचे बोट
  • ३ मध्यम केळी
  • १ १/२ कप साखर / गूळ ( पावडर )
  • २ चमचे लिंबाचा रस
  • १/२ चमचा अगर- अगर

याशिवाय,

  • बदाम भाजून त्याचे पातळ काप
  • किसलेले व्हाइट चाॅकलेट
  • किसलेले डार्क चाॅकलेट

कृती:

  1. प्रथम दही, मिल्क पावडर व गूळ मिक्सरच्या भांड्यात घालून फेटा. नंतर त्यात तेल घालून फेटा. पालकाची पाने गरम पाण्यात टाकून त्याची प्युरी कारून घ्या व ती प्युरी वरील मिश्रणात घालून फेटा. यात खायचा सोडा घालून दहा मिनिटे तसेच ठेवा. ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ काॅर्नस्टार्च एकत्र चाळून घ्या. ओव्हन १८०° वर प्रीहिट करा. पालक- दही मिश्रण व पीठाचे मिश्रण एकत्र करून चमच्याने एकाच दिशेने फेटा. घट्टसर वाटल्यास थोडे दही घालून पुन्हा फेटा. नंतर हे मिश्रण ब्रेड मोल्डमध्ये ओतून १८०° वर पंचेचाळीस मिनिटे केक बेक करून घ्या
  2. बीटाचा जॅम करण्यासाठी बीट उकडून गार झाल्यावर त्याची प्युरी करा. त्यात केळे कुस्करून घाला. नंतर त्यात साखर / गूळ घालून हे मिश्रण उकळून घ्या. एक कप पाण्यात अगर- अगर विरघळवून त्या मिश्रणात घाला व थोडे घट्टसर झाले कि झाकण ठेवा. मागच्या बाजूने कोटिंग आले कि गॅस बंद करा.
  3. सॅण्डविच करण्यासाठी केकचे स्लाईस करून घ्या. त्यासाठी केक आधी पूर्णपणे थंड करून घ्या. एका स्लाईसला बीटचा जॅम लावून त्यावर बदामाचे काप घालून त्यावर दुसरा स्लाईस ठेवून त्रिकोणी कप व त्यावर व्हाइट किंवा डार्क चाॅकलेट किसून घ्या.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


अदिती पाध्ये