दिंडा – श्रावण रेसिपी

Published by Dhanshree Phadke (Dombivali, Mumbai) on   August 5, 2017 in   Food Corner

साहित्य: ( १३ ते १४ दिंड्यांसाठी )


  • चणाडाळ – २ वाट्या
  • गूळ – २ वाट्या
  • वेलची आणि जायफळ पूड (आवश्यकतेनुसार)
  • कणीक – २ वाट्या
  • पाणी
  • साजूक तूप

श्रावण खाद्ययात्रा २०१७ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा.

कृती:


  1. २ वाट्या चणाडाळ कुकरमध्ये शिजवून घ्या.
  2. त्यात २ वाटी गूळ घालून पुरण घट्ट होईपर्यंत आटवून घेणे.
  3. वेलची व जायफळ पूड घ्यावी.
  4. पुरण थंड होत ठेऊन द्या.
  5. कणीक नेहमीपेक्षा थोडी घट्ट भिजवावी व त्याची मोठी पुरी लाटावी.
  6. पुरीत पुरण भरून चारी बाजूंनी दुमडावी.
  7. तयार दिंडा चाळणीत ठेऊन २० मि. गॅसवर वाफवून घ्या.
  8. साजूक तूपाबरोबर गरमागरम सर्व्ह करा.

Dhanshree Phadke (Dombivali, Mumbai)