आमरस बिट्ट्या विथ फजिता

Published by Varsha Dobhada on   May 17, 2018 in   Food Corner

 

तुमची रेसिपी पाठविण्यासाठी इथे क्लिक करा व आकर्षक बक्षिसे जिंका!

आमरस बिट्ट्या विथ फजिता बनविण्यासाठी  –

बिट्ट्यासाठी साहित्य:

  • १ वाटी गव्हाचे पीठ
  • ३/४ वाटी साजूक तूप
  • १/२ वाटी आमरस
  • १/४ चमचा बेकिंग पावडर
  • चिमूटभर सोडा
  • २ चमचे पिठीसाखर
  • मीठ

फजितासाठी साहित्य:

  • १ १/२ चमचा रस काढताना आंब्याच्या कोयी धुतलेले दाट पाणी
  • २ चमचे दही
  • १ लवंग
  • १/२ चमचा लाल तिखट
  • कढीपत्ता
  • कोथिंबीर
  • मीठ
  • १/४ चमचा साखर
  • १/४ चमचा मेथीदाणे
  • १/४ चमचा हिंग
  • १ चमचा साजूक तूप
  • १/२ चमचा जिरे
  • १/२ चमचा कणीक

बिट्ट्यासाठी कृती:

  1. कणीक घ्यावी. त्यात चार चमचे तूप, बेकिंग पावडर, सोडा,पिठीसाखर घालावी.
  2. आमरसात पीठ मिळावे. त्याचे अगदी छोटे गोळे करावेत. (एका घासात खाता येईल इतकेच छोटे गोळे करावेत.)
  3. मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शनवर १८० से. दहा-बारा मिनिटे बेक करावे.
  4. वरुन तुपाचे ब्रशिंग करावे.
  5. गरम असताना बिट्ट्या साजूक तूपात सोडून २ मिनिटांत बाहेत काढाव्यात.

फजितासाठी कृती:

  1. आंब्याच्या कोई धुऊन त्याचे पाणी घ्यावे.
  2. त्यात दही घालून हँडमिक्सरने फिरवावे किंवा घुसळून घ्यावे.
  3. यात मीठ,साखर घालावी.
  4. एक चमचा साजूक तूपाची फोडणी करावी.
  5. यात जिरे, हिंग,मेथीदाणे, एक लवंग घालावी. कढीपत्ता घालावा.
  6. अर्धा चमचा कणीक लालसर भाजावी.
  7. ही फोडणी आमरसच्या मिश्रणात घालून उकळावे.
  8. वरुन कोथिंबीर घालावी.

नावीन्यपूर्ण टेस्टी रेसिपी बिट्ट्या आमरसाबरोबर छान लागतात. फजिताबरोबर उत्तमच!