-
इटालियन सलाद बनवण्यासाठी लागणारे-
-
साहित्य:
-
4-5 टोमॉटो (लालबुंद कडक)
-
1 कांदा
-
1 काकडी
-
1(लहान) सिमला मिरची
-
1/2 कप (लहान तुकडे) मोझरेला चीज
-
1/2 कप बेसिलची पाने
-
8टेबलस्पून एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल
-
4 टेबलस्पून व्हिनेगर
-
1 कडक पाव (बुन पाव)
-
मीठ
-
चवीनुसार काळी मिरपूड
-
1 टेबलस्पून ऑरेगॅनो
-
1 टेबलस्पून चिलीफ्लेक्स.
-
कृती:
-
कडक पावाचे उभे जाडसर तुकडे करा व त्यावर थोडेसे लोणी परतवा. नंतर त्याचे चौकोनी तुकडे करा व त्यावर ऑरेगॅनो व चिलीफ्लेक्स भुरभुरवा. मायक्रोव्हेवमध्ये एक मिनिट हाय वर टोस्ट करा. तेल, व्हिनेगर, मीठ व काळी मिरपूड एकत्र करून ड्रेसिंग बनवा.
-
टोमॉटोचे दोन तुकडे करून त्यातील बिया, रस काढून टाका व त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करा. कांद्याचे उभे पातळ स्लाइस करा. काकडीची साले काढून तुकडे करा. सिमला मिरचीचे चौकोनी तुकडे करा. त्यात सलाद ड्रेसिंग घालून टॉस करा व एक तास फ्रिजमध्ये ठेवा.
-
सर्व्ह करताना त्यात ब्रेडचे तुकडे घाला व हलक्या हाताने एकत्र करा. ब्रेडच्या तुकडय़ांना ड्रेसिंग व रस नीट लागले पाहिजेत. सजावटीसाठी मोझरेला चीजचे तुकडे व बेसिलची पाने घाला. कडक पाव नसल्यास साध्या पावाचे टोस्ट करून घालू शकता. पण कडक पावाने सलाद खुमासदार होते.