साहित्यः
- १ कप उकडलेल्या बटाटयाचा लगदा
- अर्धा कप नारळाचे खोबरे
- अर्धा कप दूध
- २ कप साखर
- ७/८ वेलदोडे
- अर्धा चमचा सायट्रिक ॲसीड (लिंबाचे फूल)
- थोडेसे जायफळ
- थोडी जायपत्री
- अर्धी वाटी पिठीसाखर
कृती:
- पिठीसाखरेखेरीज सर्व पदार्थ एकत्र करून गॅसवर ठेवावे.
- नंतर जरा घट्टसर झाले की वालाएवढे मिश्रण एका वाटीत पाणी घेऊन त्यात घालून पहावे.
- विरघळले नाही म्हणजे उतरावे व डावेने घोटावे.
- जरा वेळ घोटल्यानंतर मग त्यात पिठीसाखर घालून पुन्हा घोटावे व ओलसर आहे तोच तूप लावलेल्या ट्रे किंवा थाळीत मिश्रण ओतून हाताला तूप लावून थापावे.
- वरील प्रमाणाच्या बर्फीसारख्या जाड २४ वडया होतात व अगदी खाण्याच्या बर्फीप्रमाणे बर्फी चवीला सुंदर लागते.
- जायफळ व जायपत्रीचा वास फार सुंदर येतो.
- त्यामुळे बटाटयाचा उग्रपणा कमी होतो.
- नंतर वडया कापून प्रत्येक वडीच्या मध्यभागी एकेक चारोळी बसवावी.
ही बर्फी उपवासाला चालते.
– सौ. मंगला बर्वे | कालनिर्णय ऑगस्ट १९७५
One thought on “उपवासाची बटाट्याची बर्फी”