साहित्य : बटाटे, हिरव्या मिरच्या वाटलेल्या, जिरेपूड, राजगिऱ्याचे पीठ, तळण्यासाठी तेल, खाण्याचा पिवळा रंग.
कृती :
- बटाटे स्वच्छ धुवून घ्या.
- कुकरमध्ये वाफवून गार करा. पुरणयंत्रातून वाटून घ्या.
- चवीनुसार हिरव्या मिरच्या वाटलेल्या, मिठ, जिरेपूड, राजगिऱ्याचे पीठ, खाण्याचा पिवळा रंग मिसळा, खूप मळा.
- शेवपात्रातून शेव पाडा. तळा.
टिप : ही शेव फारच कुरकुरीत व चवदार होते.