रव्याची खीर

Published by खाद्ययात्रा स्पर्धा २०१७ on   July 27, 2017 in   उपवासाच्या रेसिपी

साहित्य :


  • बारीक रवा पाव वाटी,
  • तूप १ चमचा, दूध २ वाटया
  • पाणी अर्धी वाटी
  • साखर ४ चमचे
  • स्वादाकरता जायफळ-वेलची पूड
  • केशर
  • सुका मेवा
  • मीठ

कृती : 


  • तुपात रवा मंद आचेवर भाजा.
  • थोडासा गुलाबी रंग आला की त्यात मीठ व पाणी घालून शिजू द्या.
  • त्यात साखर, सुका मेवा, जायफळ-वेलची पूड घाला. केशर घाला.
  • यानंतर दूध घालावे.
  • जाडसर झाले की गॅस बंद करा. खीर तयार!

टीप : गरम पाणी घातल्यास रवा छान फुलून येतो.

श्रावण खाद्ययात्रा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा.