साबुदाण्याची चकली बनविण्यासाठी –
साहित्य:
- १ वाटी साबुदाणा
- अर्धा वाटी वऱ्याचे तांदूळ
- मीठ
- जिरे
- पाणी
कृती:
- आदल्या दिवशी साबुदाणा धुवून ठेवणे.
- दुसऱ्या दिवशी सकाळी अर्धा वाटी पाणी उकळून साबुदाण्यात घालावे.
- वऱ्याचे तांदूळ भाजून स्वच्छ करुन अर्धा वाटी पाण्यात फळफळीत शिजवणे.
- साबुदाणा, वऱ्याचे तांदूळ, मीठ, जिरे एकत्र कालविणे.
- हे चांगले मळणे व चकल्यांच्या सोऱ्यातून चकल्या पाडणे व उन्हात वाळविणे.
टीप: ह्या चकलीत बटाटा घालू नये. त्याने चकली चिवट,कडक होते.
Pingback: ढोकळा | उपवासाचा ढोकळा | वैशाली जोशी | कालनिर्णय स्वादिष्ट | ऑगस्ट २०१९
Pingback: उसळ | उपवासाची मिसळ | उल्का ओझरकर | कालनिर्णय | २०१९