कारवारी सांबार मसाला

Published by नयना पिकळे on   May 20, 2017 in   Food Corner

साहित्य:

  • २ मोठी वाटी धणे
  • प्रत्येकी १ छोटी वाटी हिरवे मूग
  • अख्खे काळे उडीद
  • चणाडाळ
  • मिरी
  • मोहरी
  • १/२ लहान वाटी मेथी

कृती:

  1. कढई गरम करून वरील प्रत्येक जिन्नस वेगवेगळा कढईत मंद गॅसवर भाजून घ्यावा.
  2. छान खरपूस वास आला पाहिजे.
  3. मग सर्व एकत्र करून थोडे गरम असतानाच मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घ्यावे.

‘कारवारी सांबर मसाला’  यास कारवारी जेवणाचा backbone म्हटले तरी चालेल. अनेक कारवारी भाज्यांमध्ये हा मसाला अपरिहार्य असतो.

टीप: इडली सांबारवाला सांबार मसाला हा नव्हे.


 – नयना पिकळे । कालनिर्णय स्वादिष्ट । जानेवारी २०१६